भारतीय चित्रपटांवर पाकिस्तानात बंदी; जॉन अब्राहम म्हणाला…

मुंबई – साल 2008 मध्ये दिल्लीतील बाटला हाउसमध्ये झालेल्या सत्य घटनेवर आधारित “बाटला हाऊस” चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाने प्रेक्षकांचे मन जिकंले आहे. त्यामुळे प्रदर्शित होताच चित्रपटाने बॉक्स ऑफिसिवर विक्रमी कमाई केली. येत्या कालावधीत हा चित्रपट आणखी विक्रम प्रस्थापित करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बाटला हाऊसमध्ये अभिनेता ‘जॉन अब्राहम’ एसीपी संजीव कुमार यादव यांच्या भुमिकेत झळकताना दिसत आहे.

दरम्यान, जॉन अब्राहमने पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आलेल्या भारतीय चित्रपटांबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. “सर्वप्रथम भारतच… ” अशी प्रतिक्रिया जॉनने दिली आहे.

तर दुसरीकडे गायक ‘कैलाश खैर’ यांनी देखील या मुद्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. भारताला याचा काही फरक पडत नसल्याचे त्यांनी सांगीतले. ते म्हणाले की, “पाकिस्तानने भारतीय चित्रपटांवर बंदी घातल्याचा आम्हाला काही फरक पडत नाही”.

त्याचप्रमाणे ते पुढे म्हणाले, “त्यामुळे भारतीय चित्रपटांवर बंदी घालणे आमच्यासाठी फारसं महत्वाचं नाही. यात पाकिस्तानचं मोठं नुकसान आहे.” असं देखील कैलाश खैर म्हणाले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×