नागपूर – भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवला त्याच्याच व्यवस्थापकाने लाखोंचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एकेकाळचा जीवलग मित्र आणि उमेशचा व्यवस्थापक असलेल्या शैलेश ठाकरे त्याच्या बॅंक खात्यातून सुमारे 44 लाख रुपये लंपास केले आहेत. आरोपीने या रकमेतून स्वत:च्या नावे संपत्ती खरेदी केल्याचीही माहिती मिळत आहे. यानंतर उमेश यादवने नागपूरमधील कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी ठाकरे विरोधात 406, 420 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
INDvsNZ | टीम इंडियाची मालिकेत विजयी झेप; न्यूझीलंडचा 8 विकेट राखून पराभव
नेमके प्रकरण काय?
उमेश यादवची भारतीय क्रिकेट संघात निवड झाल्यानंतर तो स्पर्धेच्या निमित्ताने देशात आणि परदेशात जावे लागत असे. या काळात उमेशने आपला मित्र आणि आरोपी शैलेश ठाकरे याला आर्थिक आणि पत्र व्यवहार सांभाळण्याची जबाबदारी दिली. त्याने शैलेश ठाकरे याला पगारी व्यवस्थापक म्हणून नियुक्त केले होते.
व्यवस्थापक म्हणून काम करताना आरोपी शैलेशने कोणतीही काम केले नसल्याचा आरोपही उमेशने केला आहे. दरम्यान, एक संपत्ती खरेदी करण्यासाठी उमेशने आपल्या बॅंक खात्यात एकूण 44 लाख रुपये ठेवले होते. या पैशांतून उमेशसाठी संपत्ती खरेदी करण्याऐवजी शैलेशने स्वत:साठीच संपत्ती खरेदी केली. शिवाय उमेशला हे पैसेही परत दिले नाहीत.