KL Rahul Marriage – भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी हे आज विवाहबंधनात अडकले आहेत. मागील काही दिवसांपासून दोघांच्या लग्नाबाबत जोरदार चर्चा सुरु होती. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी यांची मुलगी अथिया आणि राहुल मागील बऱ्याच काळापासून रिलेशनमध्ये होते. त्यानंतर दोघांनीही आता लग्नगाठ बांधली आहे.
सुनिल शेट्टी यांच्या खंडाळा येथील बंगल्यावर १०० पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्याला क्रीडा आणि चित्रपट जगतातील अनेक दिग्गजांनीही हजेरी लावली.
विवाह सोहळ्याचे काही फोटो केएल राहुलने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघेही अत्यंत आनंदात असल्याचे दिसत आहे. राहुल आणि अथिया यांच्या लग्नानंतर अथियाचा भाऊ अहान शेट्टी आणि वडील सुनील शेट्टी यांनी पत्रकारांमध्ये मिठाई वाटली. त्याचे काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप पसंद केले जात आहेत.
महत्वाचं म्हणजे हा विवाह सोहळा अत्यंत सध्या पद्धतीने पार पाडण्यात आला. एखाद्या क्रिकेटर किंवा अभिनेत्रीचा विवाह सोहळा मोठमोठ्या ठिकाणी होतो. मात्र, राहुल आणि अथिया यांचा हा सध्या पद्धतीने पार पडलेला सोहळा चाहत्यांनाही खूपच आवडला आहे.
लोकेश राहुल हा सातवा क्रिकेटर आहे ज्याने बॉलिवूड अभिनेत्रीशी विवाह रचला आहे. राहुलच्या आधी विराट कोहली, युवराज सिंग, झहीर खान, हरभजन सिंग, मन्सूर अली खान पतौडी, मोहम्मद अझरुद्दीन, मोहसीन खान यांनीही अभिनेत्रींशी लग्न केले आहे. त्यामुळे आता राहुलच्या लग्नानंतर एक प्रकारे क्रिकेट आणि चित्रपट यांच्यामध्ये एक वेगळच नातं तयार झालं आहे.