भारतीय कसोटी संघाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane ) घरी एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. रहाणे आणि त्याची राधिका धोपावकर यांना पहिली एक मुलगी आहे. त्यानंतर आता काही वेळापूर्वी राधिकाने दुसरे आपत्य म्हणजे गोंडस मुलाला जन्म दिला आहे. दसऱ्याच्या आनंदातच आणखी आता रहाणे कुटुंबियांच्या आनंदात भर पडली आहे. अजिंक्य रहाणेने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून याबात पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. यानंतर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे.
भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणेने ( Ajinkya Rahane ) ही बातमी त्याच्या इंस्टाग्राम खात्यावरून पोस्ट शेअर करत चाहत्यांना कळवली. रहाणेने पोस्टमध्ये लिहिले की, “आज (बुधवारी ५ ऑक्टोबर) सकाळी राधिका आणि मी आमच्या बाळाचं जगात स्वागत केलं. राधिका आणि बाळ दोघंही सुखरुप आहेत. तुमच्याकडून मिळालेलं प्रेम आणि आशीर्वादासाठी खूप खूप धन्यवाद!” रहाणेच्या या इंस्टाग्राम पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
रहाणेच्या या पोस्टवर आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्सने देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कमेंटमध्ये लिहिले की, “तुझे खूप खूप अभिनंदन. आपल्या संघाची सर्वात लहान आकाराची जर्सी तयार करण्यास सांगितले आहे. ज्याच्या मागे रहाणे असे लिहिलेले असेल.” त्याचबरोबर भारताचा कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारानेही प्रतिक्रिया देत अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) आणि त्याची पत्नी राधिका यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ( Indian Cricketer Ajinkya Rahane And Wife Radhika Dhopavkar Blessed Boy Baby )
View this post on Instagram
अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) आणि राधिका यांना याअगोदर एक आर्य नावाची मुलगी आहे. जिचा जन्म ५ ऑक्टोबर २०१९ ला झाला होता. त्यानंतर आता त्यांच्या दुसऱ्या मुलाचा जन्मही ५ ऑक्टोबर २०२२ ला झाला आहे. अजिंक्य आणि राधिका यांचं लग्न २६ सप्टेंबर २०१४ ला झाले होते. सध्या अजिंक्य त्याच्या कुटुंबासोबत आनंद साजरा करत आहे.