पॅराग्वे स्पर्धेतील भारताचे आव्हान संपले

पॅराग्वे – एटीपी चॅलेंजर सिरीजमधील पॅराग्वे टेनिस स्पर्धेतील भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आले आहे. गुरुवारी नवोदित सुमित नागल पराभूत झाल्यानंतर आता दिवीज शरण व रॉबिन हासे यांनाही पराभव स्वीकारावा लागला. या तीनही खेळाडूंना या स्पर्धेत फारसा प्रभाव पाडता आला नाही. 

दिवीज व रॉबिन जोडीला जिरी लेहेश्‍का व थॉमस मॅकहॅक या जोडीकडून दुहेरीत 5-3, 7-6 असा पराभव पत्करावा लागला. नागलने एकेरी व दुहेरी गटात सहभाग घेतला होता. त्याला एकेरीच्या सामन्यात ग्रॅण्डस्लॅम विजेत्या स्टेनिस्लास वावरिंकाकडून तर दुहेरीत लिया लवाक्‍शासह खेळताना पेरी ह्युजेस पर्बर्ट व ऑर्थर रिंडेरकेंच जोडीकडून पराभूत व्हावे लागले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.