भारतीय संघाची गोलंदाजी सर्वोत्कृष्ट : डेल स्टेन

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने शनिवारी भारतीय गोलंदाजाचे कौतुक केले आहे. सद्य:स्थितीत क्रिकेटविश्वात भारतीय गोलंदाजी मारा सर्वोत्कृष्ट असल्याचे डेल स्टेन याने म्हटले आहे.
Tight call…. probably gana go with India
— Dale Steyn (@DaleSteyn62) December 21, 2019
स्टेन याला आयपीएल मध्ये राॅयल चॅलेजंर्स बेंगळुरूने गुरूवारी मूळ किमंतीत दोन कोटीत खरेदी केले. स्टेनने ट्विटरवर चाहत्यांसोबत बातचीत करताना विविध मुद्दयावर आपले मत मांडले. जेव्हा ट्विटरवर एका यूजरने त्याला विचारले की, ‘सद्यस्थितीत कोणत्या संघाकडे सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचा मारा आहे’? , तेव्हा त्याने भारतीय संघ असे उत्तर दिले. तसेच यावेळी त्याने आॅस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स हा माझा आवडता गोलंदाज असल्याचे देखील सांगितले. कमिन्सला आयपीएलमध्ये लीलावात १५ कोटी ५० लाख रूपयांची बोली लावून कोलकाता नाइट रायडर्सने आपल्या ताफ्यात घेतले.
३६ वर्षीय स्टेनने म्हटले की, ‘आयपीएलच्या आगामी सत्रात खेळण्याची मी वाट पाहत आहे’. स्टेनने आयपीएल मध्ये ९२ सामने खेळले आहेत आणि त्याने ९६ विकेट्स घेतल्या असून १०० चा आकडा पूर्ण करण्यासाठी त्याला केवळ ४ विकेट्सची गरज आहे.





