मुंबई – सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बॅंकेने घरासाठीच्या कर्जावरील व्याजदरांमध्ये कपात करून तो आता 6.40 टक्के इतका केला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 27 ऑक्टोबर पासून होणार असून हा या बॅंकेचा आतापर्यंतचा सर्वात कमी व्याजदर आहे. उत्सवाच्या काळात जास्तीत जास्त लोकांनी घरासाठी कर्ज घ्यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून ग्राहकांनी या निर्णयाचा लाभ घ्यावा असे बॅंकेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.