बासेल – भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल स्विस ओपन स्पर्धेतून बाहेर पडली आहे. महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत मलेशियाच्या किसोना सेल्वादुरेकडून पराभव पत्कारावा लागल्याने सायनाचे आव्हान संपुष्टात आले.
23व्या मानांकित सायनावर 64व्या क्रमांकावर असलेल्या किसोनाने 21-17, 13-21, 13-21 असा विजय मिळविला. या सान्यात सायनाला पहिल्या गेममध्येही सातत्य राखता आले नाही. तथापि, दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू आणि जागतिक स्पर्धेतील रौप्य विजेते किदाम्बी श्रीकांत यांच्यासह तिच्या चार देशबांधवांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला आहे.