पुणे – भारतीय बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे आज निधन झाले आहे. मृत्यूसमई ते 88 वर्षाचे होते. नंदू नाटेकर यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला आहे. नाटेकर यांनी १५ वर्षाच्या कारकिर्दीत १०० पेक्षा जास्त स्पर्धा जिंकल्या आहेत.
नंदू नाटेकर हे अर्जुन पुरस्कार मिळवलेले पहिले खेळाडू होते. तसेच भारताबाहेर विजेतेपद मिळवणारे नंदू नाटेकर पहिले बॅडमिंटन खेळाडू आहेत.त्यांनी १५ वर्षाच्या कारकिर्दीत १०० पेक्षा जास्त स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यात १७ राष्ट्रीय विजेतेपदांचा समावेश आहे. ६ एकेरी, ६ दुहेरी, ५ मिश्र दुहेरी स्पर्धेत त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केले आहे.
सांगलीमध्ये जन्म झालेल्या नाटेकर यांनी वयाच्या 20 व्या वर्षी 1953 साली सर्वप्रथम देशाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे 1954 मध्ये त्यांनी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली होती. नंदू नाटेकर स्पोर्ट्स अँड फिटनेस चे संचालक होते. त्यांच्या जाण्याने क्रिडा विश्वात शोक व्यक्त केले जात आहे.