चिनी याकांना टक्कर देण्यासाठी भारतीय ‘बॅक्ट्रियन’ उंट सज्ज!

पुणे – सध्या भारत आणि चीनमध्ये सीमावादावरून युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. चीनचे लपून छपून भ्याड हल्ले सुरूच असल्यामुळे भारतीय सैनिकांना 24 तास सतर्क राहावे लागत आहे. सीमाभागातील हवामान, भौगोलिक रचना आदींचा विचार करून चीनने ‘याक’ या प्राण्याची टेहळणी करण्यासाठी निवड केली आहे. 

चिनी सैनिक या याकचे दूध पितात. जेव्हा हे याक आजारी पडतात तेव्हा त्यांना मारून त्यांचे मांस ही खातात. तेव्हा या याक प्राण्याचे चिनी सैन्यात महत्त्व वाढलेले असताना आपल्या भारतीय लष्करानेही दोन कुबड असलेल्या ‘बॅक्ट्रियन’ उंटाची निवड दलात केली आहे. 

‘डबल हम्प’ म्हणूनही हा उंट ओळखला जातो. या उंटाची मोठ्या संख्येने सैन्यदलात भरती केली जाणार आहे. त्यांना जड सामान वाहून नेणे आणि टेहळणी या दोन कामासाठी प्रशिक्षित केले जाईल. 

‘डबल हम्प’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या आगळ्यावेगळ्या उंटाची वैशिष्ट्ये पाहुयात….

  • डबल हम्प किंवा बॅक्ट्रियन उंट लडाख भागात आढळतो. त्यामुळे या उंटाला लडाखी उंट असेदेखील म्हटले जाते.
  • सामान्य उंट प्रजातींपेक्षा हा थोडा वेगळा आहे. भारताव्यतिरिक्त, आता या उंटांच्या प्रजाती गोबी, मंगोलिया, कझाकस्तान आणि चीनच्या काही भागात शिल्लक आहेत. जंगल तसेच वृक्षरहित मैदाने आणि वाळवंटात हा उंट सापडतो.
  • त्याच्या शरीरावर तपकिरी केस असतात, ज्यामुळे थंड प्रदेशातल्या थंडीपासून त्यांचे संरक्षण करतात. हे केस उन्हाळ्यात गळून जातात आणि हिवाळ्यात परत नव्याने उगवतात.
  • या उंटांच्या शरीरात थंड भागात राहण्याची मोठी क्षमता आहे. तसेच वाळवंटातील ऊनही ते सहन करू शकतात. या उंटांना गटात राहणे आवडते.
  • सामान्य उंटांप्रमाणे या उंटाची उंचीही सरासरी सात फुटांपर्यंत असते. प्रौढ बॅक्ट्रियन उंटाचे वजन 300 ते 700 किलोग्रॅम दरम्यान असू शकते.
  • आता यांच्या पाठीवरील दोन कुबड्यांविषयी एक मनोरंजक गोष्ट. चरबी, जे अन्नातून तयार होते, ते या दोन कुबड्यांमध्ये साचत राहते. जेव्हा या उंटांना अनेक दिवस अन्न आणि पाणी मिळत नाही तेव्हा ही चरबी त्यांना शक्ती, सामर्थ्य देते.
  • एका सामान्य उंटाप्रमाणे हे ही बरेच दिवस पाणी न पिऊन जगू शकतात. हिवाळ्यात, हा उंट अनेक आठवडे पाणी न पिता घालवू शकतो. यामागील एक कारण म्हणजे त्याला अन्नापासून ओलावा मिळतो.
  • वाळवंटात येणारी बहुतेक सर्व प्रकारची वनस्पती हा खातो. बॅक्ट्रियन उंटाचे आयुष्य 50 वर्षांपर्यंत असू शकते. गंमत म्हणजे तीन लोक एकाच वेळी त्यांच्या पाठीवर बसू शकतात.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.