नवी दिल्ली – भारतीय लष्कराच्या जवानांचा पोशाष अधिक स्मार्ट आणि आरामदायी करण्यात येणार आहे. आर्मी युनिफॉर्म मध्ये कोणते कोणते बदल केले जाऊ शकतात यासंदर्भात भारतीय लष्कराच्या मुख्यालयातून सर्व जवानांना आणि अधिकाऱ्यांना सूचना देण्यास सांगितले आहे.
दरम्यान, मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यात भारतीय लष्करातील अधिकारी आणि जवानांचा युनिफॉर्म बदलण्यासंदर्भात चर्चा झाली. हा युनिफॉर्म अधिक स्मार्ट आणि आरामदायी करण्यावर भर दिला जाणार आहे. मिळलेल्या वृत्तानुसार माहितीनुसार, अन्य देशांप्रमाणे शर्ट आणि पॅन्टचा कलर वेगवेगळा ठेवण्यात यावा अशी सूचना देखील करण्यात आली आहे. सध्या भारतीय लष्करातील युनिफॉर्ममध्ये खांद्यावर एका पट्टीवर लावण्यात आलेल्या स्टारमुळे संबंधित अधिकाऱ्याची रॅक लक्षात येते. अमेरिका आणि इंग्लंडमध्ये लष्कारच्या युनिफॉर्मवर छातीवर स्टार लावले जातात. भारतीय लष्करातील अधिकारी आणि जवानांचा रॅक देखील अशाच प्रकारे दाखवली जावी अशी सूचना देखील आली आहे.
तत्पूर्वी, भारतीय लष्कराची क्षमता आणि सामर्थ्य वाढवण्यात मैलाचा दगड ठरणाऱ्या एम777 ए-2 अल्ट्रा लाईट हॉविट्झर, के-9 वज्र स्वचलित बंदुका आणि 6x 6 युद्धभूमीवरील दारुगोळा ट्रॅक्टर्स संरक्षण मंत्री निर्मला सितारामण यांनी राष्ट्र सेवेत समर्पित केले. 155 मि.मी.च्या 39 क्षमतेच्या अल्ट्रा लाईट (वजनाने अति हलक्या) हॉविट्झर तोफा अमेरिकेकडून घेण्यात आल्या असून, भारतात महिंद्र डिफेन्स आणि बीएई सिस्टीम्स यांच्या भागीदारीतून या तोफांची जुळणी करण्यात आली आहे. ही तोफ प्रणाली बहुआयामी, वजनाने हलकी तसेच हेलिकॉप्टरद्वारे नेता येण्यासारखी आहे. यामुळे देशातल्या विविध भौगोलिक विभागात या तोफा सहजतेने तैनात करता येतील. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि जगातल्या इतर काही देशांच्या लष्करात या तोफा तैनात आहेत. अफगाणिस्तान आणि इराण सारख्या दुर्गम भागात या तोफांची कार्यक्षमता सिद्ध झाली आहे.