श्रीनगर – पुन्हा एकदा भारतीय जवानांनी पाकिस्तानचा कट उधळून लावला आहे. पाकिस्तानी दहशतवादी जम्मू-काश्मिरमध्ये शस्त्रांची तस्करी करण्याचा प्रयत्न करत होते. हा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला आहे. हशतवाद्यांचा गेल्या पाच दिवसातील हा दूसरा प्रयत्न होता.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी साडेसहा वाजता उत्तर काश्मीरच्या तंगधार सेक्टरमध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांसह सैन्य दलातील जवानांनी संयुक्त शोध मोहीम सुरू केली होती. यादरम्यान, संयुक्त पथकाने एलओसी जवळील एका ठिकाणाहून पाच पिस्तूल, दहा मॅगझीनसह 138 राऊंड दारूगोळा हे साहित्य जप्त केले.
दरम्यान, 9 ऑक्टोंबर रोजी उत्तर काश्मीरच्या जवळील केरन सेक्टरमध्ये कार्यरत असलेल्या भारतीय सैनिकांनी चार एके 74, आठ मॅगझीन आणि 240 एके रायफर दारू गोळा इत्यादी साहित्य जप्त केले होते.