जम्मू काश्मीरमध्ये लष्कर, वायूसेना आणि सुरक्षा यंत्रणांना हायअलर्ट

श्रीनगर – जम्मू-काश्मीर मधून अनुच्छेद-370 हटवल्यानंतर पाकिस्तानने कुरापती सुरु केल्या आहेत. काश्मीर खोऱ्यात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न पाकिस्तान करण्याची शक्यता आहे. त्यासाठी पाकचे दहशतवादी मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचरांनी दिली आहे.

या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये तैनात असलेल्या भारतीय दलाला दक्ष राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये भारतीय लष्कर, हवाई दल आणि सुरक्षा यंत्रणांना हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, काश्मीरचा विशेष दर्जा काढल्यानं आणि त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्यानं दहशतवादाचा अजेंडा राबवणं कठीण जाईल असं पाकिस्तानला वाटतं. त्यामुळेच जम्मू-काश्मीर मधून अनुच्छेद-370 हटवल्यानंतर पाकिस्तानने कुरापती सुरु केल्या आहेत. या विरोधात तो जगभरात आपलं समर्थन करण्याची मागणी पाकिस्तान करतो आहे. पण चीन शिवाय कोणताच मोठा देश पाकिस्तान सोबत उभा नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.