दुपारी होणार भारतीय वैमानिक अभिनंदन वर्धमान यांची सुटका

इस्लामाबाद – पाकिस्तानी सैन्याच्या तावडीत सापडलेले भारतीय हवाई दलाचे वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची आज दुपारी ३ ते ४ च्या सुमारास  सुटका केली जाणार आहे. वाघा सीमेवर पाक सैनिक आर्मी विंग कमांडर अभिनंदन यांना भारतीय उच्चायुक्तच्या प्रतिनिधीकडे सोपविण्यात येणार आहे.

शांततेसाठी अभिनंदन यांची सुटका केली जाणार आहे. दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला तणाव कमी होण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यास तयार आहेत,असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी म्हटले होते. त्यानंतर केवळ तासाभरातच पाकिस्तानच्या संसदेच्या संयुक्‍त अधिवेशनादरम्यान इम्रान खान यांनी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. तसेच पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी ट्विटर द्वारे याची माहिती दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.