नवी दिल्ली – भारतीय वायु दलाच्या ताफ्यात ‘अपाची’ हे अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर दाखल झाले आहे.भारताने अमेरिकेबरोबर २२ अपाची हेलिकॉप्टर खरेदीचा करार केला आहे. त्यातील पहिलं विमान आज भारतीय सैन्यात दाखल झालं आहे.
जगातील आक्रमक हेलिकॉप्टर म्हणून अपाची अटॅक हेलिकॉप्टर ओळखलं जातं. या हेलिकॉप्टरमुळे भारतीय हवाई दलाची क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.
हेलिकॉप्टरच्या पायलट आणि क्रु मेंबरची ट्रेनिंग सध्या सुरू आहे.हेलिकॉप्टर भारताच्या हवाली करताना भारतीय सेनेचे एअर मार्शल ए.एस. बुटेला, बोईंग आणि अमेरिकेचे प्रशासकीय अधिकारी देखील हजर होते.
दरम्यान, सप्टेंबर 2015 मध्ये भारत आणि अमेरिकेत 13,952 कोटी रुपयांचा ‘अपाची’ हेलिकॉप्टर खरेदीचा करार झाला होता. भारताला मार्च 2020 पर्यंत 22 अपाची हेलिकॉप्टर मिळणार आहेत.