भारतीय हवाई दलाला मिळाला इस्रायलकडून स्पाइस-2000 बॉम्ब

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाला बालाकोट एअर स्ट्राइकमध्ये यशस्वीरीत्या वापरलेल्या स्पाइस-2000 बॉम्बचा पहिला टप्पा मिळाला आहे. हवाई दलाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती दिली.

इस्रायली कंपनीकडून हे बॉम्ब मिराज-2000 लढाऊ विमानाच्या ग्वाल्हेर या तळाला मिळाले आहेत. हेच विमान इस्रायली बॉम्ब फायर करण्यास सक्षम आहेत. हवाई दलाने इस्रायलसोबत 250 कोटीपेक्षा जास्त किमतीचा करार केला होता. ‘स्पाईस’ हे नाव स्मार्ट, प्रीसेशन इम्पॅक्‍ट व कॉस्ट इफेक्‍टीव्ह या इंग्रजी नावांच्या आद्याक्षराने तयार करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.