भारतीय हवाई दलाचे प्रमुख तळ दहशवाद्यांच्या रडारवर

दहशतवादी आत्मघातकी हल्ल्याच्या तयारीत
हवाई दलास गुप्तचर यंत्रणांकडून हाय अलर्ट जारी

नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 केंद्र सरकारने रद्द केल्यानंतर पाकिस्तानसह दहशतवादी संघटना भारतात कारवाया करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी सीमारेषेवरून वारंवार घुसखोरीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यातच आता भारतीय हवाई दलाचे प्रमुख तळ दहशतवाद्यांच्या रडावर असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे गुप्तचर यंत्रणेकडून भारतीय हवाई दलास हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जम्मू-काश्‍मीर आणि त्याच्या आसपासच्या भागात स्थित लष्करी आस्थापनांवर आत्मघातकी हल्ल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. जैश-ए-मोहम्मदचे आठ ते 10 दहशतवादी जम्मू-काश्‍मीरमध्ये आणि त्याच्या आसपास असलेल्या भारतीय हवाई दलाच्या तळांवर आत्मघातकी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात गुप्तचर यंत्रणांनी अलर्ट जारी केला आहे. त्यानंतर अनेक सैन्य दलांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक केली गेली आहे. गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱ्यानंतर वायुसेनेने उत्तर भारतातील पाच हवाई मार्गांवर हाय अलर्ट जारी केला आहे. यात श्रीनगर, अवंतीपोरा, जम्मू, पठाणकोट आणि हिंडन एअरबेसचा समावेश आहे. हवाई दलाचे प्रमुख अधिकारी प्रत्येक परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.