तिरुअनंतपूरम – भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेला आज येथे होत असलेल्या पहिल्या सामन्याने प्रारंभ होत आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील ही शेवटची टी-20 मालिका आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
India win the toss and will bowl in the first T20I against South Africa 🇮🇳 🇿🇦#INDvSA | Scorecard: https://t.co/hTroM6A741 pic.twitter.com/9Gy9aQ7iuZ
— ICC (@ICC) September 28, 2022
भारतीय कर्णधार रोहित शर्माने संघात चार बदल केले आहेत. या मालिकेसाठी भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पांड्याला विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी ऋषभ पंत आणि अर्शदीप सिंगला प्लेइंग-11 मध्ये स्थान देण्यात आले आहे.
त्याचवेळी जसप्रीत बुमराह अनफिट आहे. त्यांच्या जागी दीपक चहरला संधी देण्यात आली आहे. युझवेंद्र चहलही हा सामना खेळत नाही. त्याच्या जागी रविचंद्रन अश्विनचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे.
दोन्ही संघाची प्लेइंग-11 खालीलप्रमाणे –
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, अक्षर पटेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), दीपक चहर, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, रविचंद्रन अश्विन.
🚨 Team News 🚨
A look at #TeamIndia‘s Playing XI for the first #INDvSA T20I 🔽
Follow the match ▶️ https://t.co/L93S9jMHcv pic.twitter.com/Uay6kuQJbE
— BCCI (@BCCI) September 28, 2022
दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रिले रुसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पारनेल, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे, तबरीझ शम्सी, केशव महाराज.
1ST T20I. South Africa XI: Qd Kock(w), T Bavuma(c), R Rossouw, A Markram, D Miller, T Stubbs, W Parnell, K Rabada, K Maharaj, A Nortje, T Shamsi https://t.co/yQLIMooZxF #INDvSA @mastercardindia
— BCCI (@BCCI) September 28, 2022
दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका टी-20 मध्ये 20 वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी टीम इंडियाने 11 सामने जिंकले असून दक्षिण आफ्रिकेने 8 सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला.