#WIvIND : ‘विराट-भूवी’ची दमदार कामगिरी, भारताचा वेस्टइंडिजवर विजय

पोर्ट ऑफ स्पेन – कर्णधार विराट कोहलीचे दमदार शतक आणि भुवनेश्वर कुमारच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातं वेस्टइंडिजचा 59 धावांनी पराभव करत विजय मिळवला. या विजयासह तीन सामन्याच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

#INDvWI : विराटचे दमदार शतक, वेस्ट इंडिजसमोर 280 धावांचे लक्ष्य

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने 50 षटकांत 7 बाद 279 धावा केल्या. त्यानंतर विंडीजला पावसामुळं 46 षटकांत 270 धावांचं आव्हान देण्यात आलं. या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचा संघ 210 धावांपर्यंत मजल मारू शकला.

सामन्यात फलंदाजीमध्ये विराट कोहली याने कारकिर्दीतील 42 वे शतक पूर्ण केले. त्याने 125 चेंडूत (14 चौकार आणि 1 षटकार) 120 धावा केल्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. श्रेयस अय्यरने 68 चेंडूत 71 धावा करत महत्वपूर्ण योगदान दिलं.

गोलंदाजीमध्ये वेगवान गोलंदाजानी प्रभावी गोलंदाजी केली. भुवनेश्वर कुमार याने 8 षटकांत 31 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांनी 2 तर रविंद्र जडेजा आणि खलील अहमद यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

Leave A Reply

Your email address will not be published.