भुवनेश्वर : एफआयएच प्रो-हाॅकी लीग स्पर्धेमध्ये कलिंगा स्टेडियमवर शनिवारी रंगलेल्या भारत-आॅस्ट्रेलिया दरम्यानच्या दुस-या सामन्यात निर्धारित वेळेमध्ये दोन्ही संघात २-२ अशी बरोबरी होती. त्यानंतर झालेल्या पेनल्टी शूटआउटमध्ये भारतीय पुरूष हाॅकी संघाने आॅस्ट्रेलियाला ३-१ असे पराभूत करत विजय नोंदविला.
भारतीय संघाकडून रूपिंदर पाल सिंगने २५ व्या, तर हरमनप्रीत सिंगने २७ व्या मिनिटाला गोल केले. आॅस्ट्रेलियाकडून ट्रेंट मिटनने २३ व्या तर अॅरन झालेवस्कीने ४६ व्या मिनिटाला गोल नोंदवले.
When the going gets tough, #MenInBlue get going. 🇮🇳
We have won another game in the Penalty Shootout of the #FIHProLeague, this time against the @Kookaburras 😎
Who impressed you the most in today's #INDvAUS encounter? 😉#IndiaKaGame #HockeyInvites #HockeyAtItsBest pic.twitter.com/MqumMLr66l
— Hockey India (@TheHockeyIndia) February 22, 2020
बरोबरीनंतर पेनल्टी शूटआउटमध्ये भारतातर्फे हरमनप्रीत, विवेक सागर प्रसाद आणि ललित उपाध्याय यांनी गोल नोंदवले. आॅस्ट्रेलियाकडून केवळ डॅनिएल बेलला गोल करत आला.
भारताचा गोलरक्षक पी.आर. श्रीजेशने शूटआउटमध्ये प्रभावी कामगिरी केली व भारतास विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने बोनस गुणसुध्दा प्राप्त केले. हरमन सिंग सामन्याचा मानकरी ठरला. दरम्यान शुक्रवारी झालेला सामन्यात भारताला आॅस्ट्रेलियाकडून ३-४ असा पराभव पत्करावा लागला होता.