#INDvENG : टी20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, मंधानाकडे टी20 संघाचे नेतृत्व

नवी दिल्ली – भारतीय महिला संघाने इंग्लंड विरूध्दच्या तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली असून मालिकेतील तिसरा सामना 20 फेब्रुवारीला मुंबईमध्ये होणार आहे. यानंतर तीन टी20 क्रिकेट सामन्याची मालिका होणार आहे, त्याकरिता आज बीसीसीआयने भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे.

टी20 संघाची नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर तदुंरस्त नसल्याने तिच्या अनुपस्थित युवा फलंदाज स्मृति मंधाना हिला संघाच्या नेतृत्वपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय सघात कोमल जांजड आणि फुलमाली यांना पहिल्यांदाच संघात स्थान देण्यात आले आहे. तर एकदिवसीय मालिकेत हरमनप्रीत कौरच्या ऐवजी संघात स्थान दिलेल्या हर्लिन देयोल हिला टी20 संघातही पहिल्यादाच संधी मिळाली आहे. तर वेदा कृष्णामूर्तिचे दोन महिन्यानंतर संघात पुनरागमन झाले आहे. अनुभवी फलंदाज मिताली राज हिलासुध्दा टी20 संघात स्थान देण्यात आले आहे.

दरम्यान डायलान हेमलता, मानसी जोशी आणि प्रिया पुनिया यांना संघातून वगळले आहे. भारत आणि इंग्लंड महिला संघाच्या एकदिवसीय मालिकेतील सर्व सामने हे मुंबईत आयोजित केले आहेत.तर टी20 मालिकेच्या आयोजनाची जबाबदारी गुवाहटी क्रिकेट बोर्डला देण्यात आली आहे. टी20 मालिकेतील पहिला सामना 4 मार्च, दुसरा सामना 7 मार्च आणि तिसरा सामना 9 मार्चला खेळवला जाणार आहे.

भारतीय महिला संघ – स्मृति मंधाना (कर्णधार), मिताली राज, जेमिमा रोड्रिगेज, दीप्ति शर्मा, तान्या भाटिया (यष्टीरक्षक), भारती फूलमाली, अनुजा पाटिल, शिखा पांडे, कोमल जांजड़, अरुणधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिष्ट, राधा यादव, वेदा कृष्णामूर्ति आणि हर्लिन देयोल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.