#HockeyIndia : राणी रामपाल ठरली ‘सर्वोत्कृष्ट अॅथलिट’

नवी दिल्ली : भारतीय महिला हाॅकी संघाची कर्णधार राणी रामपाल हिची ‘ वर्ल्ड गेम्स अॅथलिट आॅफ दि इयर’ या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.   ‘वर्ल्ड गेम्स’तर्फे गुरूवारी यासंबंधीची घोषणा करण्यात आली.

जागतिक स्तरावर हा पुरस्कार पटकवणारी राणी रामपाल ही पहिलीच हाॅकीपटू ठरली आहे. या पुरस्करासाठी मानांकने मिळालेल्या २५ खेळाडूंमधून क्रीडाप्रेमींनी केलेल्या मतदानावरून विजेत्या खेळाडूची निवड करण्यात आली. राणीला सर्वाधिक १ लाख ९९ हजार ४७७ मते मिळाली. यासाठी जगभरातून क्रीडाप्रेमींकडून २० दिवस मतदान सुरू होते.

पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय हाॅकी महासंघाने ( एफआयएच) ट्वीट करत राणी रामपालचे अभिंनदन केले आहे. या पुरस्काराच्या स्पर्धेत उक्रेनच्या कराटे खेळाडू स्टेनिसलाव होरूना ही दुस-या स्थानी तर कॅनाडाची वेटलिफ्टर खेळाडू रिया स्टिन तिस-या क्रमांकावर राहिली.

मागील वर्षी भारतीय महिला संघाने ‘एफआयएच सीरीज’ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते आणि राणीने स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार पटकावला होता. तसेच राणीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तीनवेळा आॅलिम्पिंक स्पर्धेत पात्रता मिळवली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.