मेलबर्न : शफाली वर्माच्या तडाखेबाज ४६(३४) फलंदाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघाने टी-२० विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड संघाचा ४ धावांनी पराभव करत विजयाची हॅटट्रिक नोंदविली. यासह भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. शफाली वर्मा सामन्याची मानकरी ठरली.
India have qualified for the #T20WorldCup semi-finals 🎉 pic.twitter.com/3QLefaxNpE
— T20 World Cup (@T20WorldCup) February 27, 2020
भारतीय संघाने विजयासाठी दिलेल्या १३४ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघास २० षटकात ६ बाद १२९ धावसंख्येपर्यतच मजल मारता आली आणि त्यांना ४ धावांनी पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडकडून मैडी ग्रीनने २४(२३), केटी मार्टिनने २५(२८), हेली जेनसनने ११(०७) आणि एमेली केर हिने नाबाद ३४(१९) धावांची खेळी केली, पण संघास विजय मिळवून देण्यास त्यांना अपयश आले.
https://twitter.com/BCCIWomen/status/1232925954575482880?s=19
भारतीय संघाकडून सर्वच गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. भारतीय संघाकडून दिप्ति शर्मा, शिखा पांडे, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव आणि राधा यादव यांनी प्रत्येकी १ विकेट घेत संघाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिले.
Innings Break! #TeamIndia post a total of 133 on the board. Can we defend it? #INDvNZ #T20WorldCup
Live 👉 https://t.co/PzUxm5OQ1F pic.twitter.com/ByRGCxayBJ
— BCCI Women (@BCCIWomen) February 27, 2020
न्यूझीलंडने टाॅस जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होतं. त्यानंतर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना शफाली वर्माच्या ४६(३४), तानिया भाटियाच्या २३(२५), राधा यादवच्या १४(९) आणि शिखा पांडेच्या नाबाद १०(१४) धावांच्या खेळीच्या जोरावर २० षटकात ८ बाद १३३ धावा केल्या होत्या.
न्यूझीलंडकडून गोलंदाजीत एमेली केर आणि रोजमेरी मेर यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. तर ली तहुहु, सोफि डिवेइन आणि लेह कैस्परेक यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.