नवी दिल्ली – युरोपीयन देश ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी एकाच वेळी अनेक ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात आतापर्यंत २ जणांचा मृत्यू झाला असून१५ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले कि, व्हिएन्नामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे मोठा धक्का बसला असून दुःख झाले आहे. या संकटाच्या काळात भारत ऑस्ट्रियासोबत उभी आहे. पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो, असे ट्विट त्यांनी केले आहे.
Deeply shocked and saddened by the dastardly terror attacks in Vienna. India stands with Austria during this tragic time. My thoughts are with the victims and their families.
— Narendra Modi (@narendramodi) November 3, 2020
दरम्यान, व्हिएन्नामध्ये मुंबईत 26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रमाणे हल्ला झाला आहे. शहरात सहा वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यामुळे शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी एका दहशतवाद्याला ठार केलं असून त्याच्या शरीरावर बॉम्ब बांधण्यात आला होता.