जकार्ता – आशिया करंडक हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने बुधवारी जपानचा 1-0 असा पराभव करत ब्रॉंझपदक मिळवले. मंगळवारी दक्षिण कोरियाकडून पराभव स्वीकारलेल्या भारतीय संघाने जपानविरुद्ध मात्र यशस्वी कामगिरी केली.
ब्रॉंझपदकासाठी झालेल्या या सामन्यात भारताकडून राजकुमार पालने याने सहाव्या मिनिटालाच गोल करत आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर जपानला चारही सत्रांमध्ये पेनल्टी कॉर्नर मिळाल्यानंतरही एकही गोल करता आला नाही. या सामन्यात भारतीय संघ अखेरची काही मिनिटे 10 खेळाडूंसह खेळला.
Indian Men’s Hockey team clinches BRONZE after defeating Japan 1-0 in the Hero Asia Cup 2022. 🥉
Great teamwork, #MenInBlue! 🇮🇳
#HeroAsiaCup #TeamIndia #HockeyIndia pic.twitter.com/VVXD2BZtly
— Dept of Sports MYAS (@IndiaSports) June 1, 2022
यापूर्वी झालेल्या सुपर फोर गटाच्या निर्णायक सामन्यात दक्षिण कोरियाशी 4-4 अशी बरोबरी झाल्यामुळे तसेच मलेशियाने जपानला पराभव केल्यामुळे भारताला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले होते.