बर्मिंगहॅम – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हॉकीमध्ये अखेर भारताच्या महिला हॉकी संघाला ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. या पदकासाठी झालेल्या लढतीत भारतीय महिला संघाने न्यूझीलंडचा 2-1 असा पराभव केला. तब्बल 16 वर्षांनंतर भारताच्या महिला संघाला या स्पर्धेत पदक मिळाले आहे.
MOOD: #WomenInBlue 😍🥉
Swipe for even more VIBES 😎👉
Picture Credits: World Sports pics#IndiaKaGame #HockeyIndia #B2022 #Birmingham2022 @CMO_Odisha @sports_odisha @IndiaSports @Media_SAI pic.twitter.com/bqvIeTTfWN
— Hockey India (@TheHockeyIndia) August 7, 2022
हे पदक मिळाल्यामुळे गेल्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये आलेले अपयश भारताच्या महिला हॉकी संघाने धुऊन काढले. पहिला हाफ सुरू झाल्यावर सलिमा टेटे हिने भारताचा पहिला गोल नोंदवला व आघाडी मिळवून दिली. मात्र, ही आघाडी फार काळ टिकली नाही.
ओलिव्हिया मेरीने गोल करत न्यूझीलंडला सामन्यात बरोबरी प्राप्त करून दिली. सामन्याच्या उर्वरित वेळात दोन्ही संघांनी एकमेकांचे बचाव भेदण्याचा केलेले प्रयत्न अपयशी ठरले.
मात्र, या बरोबरीनंतर झालेल्या शूटआउटमध्ये भारताने गोल करत या सामन्यासह ब्रॉंझपदकाची कमाई केली. भारताची गोलकीपर सविताने शूटआउटमध्ये तब्बल तीन गोल वाचवले.