#INDWvENGw : भारतीय महिला संघाचा इंग्लंडवर ५ विकेटनी विजय

नवी दिल्ली : भारतीय महिला संघाने आॅस्ट्रेलियात सुरू असलेल्या तिंरगी टी-२० क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडचा ५ विकेटनी पराभव केला आहे. आता भारताचा पुढील सामना २ फेब्रुवारीला आॅस्ट्रेलियाविरूध्द होईल.

विजयासाठीचे १४८ धावांचे आव्हान भारतीय महिला संघाने १९.३ षटकांत ५ बाद १५० धावा करत पूर्ण केले. भारताकडून फलंदाजीत कर्णधार हरमनप्रीत कौरने सर्वाधिक ४२(३४),  शेफाली वर्माने ३०, जेमिमाह रोड्रिग्जने २६, स्मृति मंधानाने १५, दिप्ती शर्माने नाबाद १२ आणि तानिया भाटियाने ११ धावांची खेळी केली. इंग्लंडकडून गोलंदाजीत कैथरिन ब्रंट हिने २ गडी बाद केला.

इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १४७ धावा केल्या होत्या.इंग्लंडकडून फलंदाजीत कर्णधार हीथर नाईटने ६७(४४), टैमी बिउमाॅन्टने ३७(२७) आण् नताली स्कीवरने २० धावांची खेळी केली. भारताकडून गोलंदाजीत राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडेय आणि दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. राधा यादवने १ गडी बाद केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.