नवी दिल्ली :- पेट्रोलियम पदार्थाच्या साठ्यासंदर्भात भारत- अमेरिकादरम्यान सहकार्य करार झाला आहे. त्यानुसार भारत अमेरिकेत क्रुडचे राखीव साठे करणार आहे.
पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, यासंदर्भात दीर्घ पल्ल्याच्या सहकार्य करार केला आहे. अमेरिकेमध्ये तेलाचे 714 दशलक्ष पिंपाचे साठे केले जाऊ शकतात. भारतामध्ये केवळ 38 दशलक्ष पिंपाचे साठे केले जाऊ शकतात. हे साठे भारताला केवळ 9.5 दिवस चालू शकतात. प्रत्येक देशाने किमान 90 दिवसांचे तेलाचे साठे करणे अपेक्षित आहे. मात्र भारताला ही क्षमता प्राप्त करण्यासाठी बराच प्रयत्न करावा लागणार आहे.