… तर भारत २० अणुबॉम्ब टाकून पाकिस्तानला संपवून टाकेल – परवेझ मुशर्रफ 

नवी दिल्ली – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. भारत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे. तर पाकिस्तान भारताला सातत्याने अणुबॉम्बची धमकी देत आहे. यावर पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी पाकिस्तानला चेतावनी दिली आहे. पाकिस्तानने एकही अणुबॉम्ब भारतावर टाकला तर भारत २० अणुबॉम्ब टाकून पाकिस्तानला संपवून टाकेल, असे परवेझ मुशर्रफ यांनी म्हंटले आहे. यासंदर्भातील वृत्त पाकिस्तानी वृत्तपत्रांनी दिले आहे.

भारत-पाकिस्तान संबंधावर बोलताना परवेझ मुशर्रफ म्हणाले, दोन्ही देशांमध्ये बिघडलेल्या संबंधानंतरही अणुबॉम्बची हल्ला होण्याची शक्यता नाही. परंतु, पाकिस्तानने एकही अणुबॉम्ब भारतावर टाकला तर भारत २० अणुबॉम्ब टाकून पाकिस्तानला संपवून टाकेल. यावर उपाय एकच पहिल्यांदा पाकिस्तानला ५० अणुबॉम्ब भारतावर टाकावे लागतील. तरच भारत २० अणूबॉम्ब वापरण्याच्या स्थितीमध्ये राहणार नाही. तुम्ही पहिला अण्वस्त्र हल्ला करण्यासाठी तयार आहात का? असा प्रश्नही मुशर्रफ यांनी विचारला.

दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी भारताकडे शांततेची अजून एक संधी मागितली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.