Economy News – सध्या आर्थिक स्थितीबाबत भारत जगात पाचव्या क्रमांकावर असून येत्या तीन वर्षांत देश तिसऱ्या क्रमांकावर येईल. वर्ष 2047 पर्यंत भारत 30 ट्रिलियन अमेरिकन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल, असा आशावाद केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला. झारखंडमधील जमशेदपूर येथील स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या प्लॅटिनम ज्युबिली समारंभाच्या समारोप समारंभात प्रधान बोलत होते.
धर्मेंद्र प्रधान म्हणाले, 75 वर्षांपूर्वी जेव्हा ही शिक्षण संस्था अस्तित्वात आली तेव्हा भारताची अर्थव्यवस्था म्हणून गणना केली जात नव्हती. आज आपण सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहोत आणि तीन ट्रिलियन अमेरिकन डॉलर्ससह जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत.
2047 पर्यंत आपली अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डाॅलर्ससह तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल. आमच्याकडे लाखो रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. शिवाय आम्ही सेवा क्षेत्रात स्वावलंबहोत आहोत.
केंद्रीय मंत्री म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरण संपत्ती आणि रोजगार निर्मितीच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे. देशाला मेगा पॉवर हाऊस आणि जगाची प्रेरक शक्ती बनवण्यासाठी विधायक भूमिका बजावण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.