इराणची हवाई हद्द भारत टाळणार

नवी दिल्ली – अमेरिका आणि इराण दरम्यानच्या वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभुमीवर इराणची प्रभावित हवाई हद्द न वापरण्याचा निर्णय भारतीय विमान कंपन्यांनी घेतला आहे. इराणची प्रभावित असलेली हवाई हद्द वगळून विमान प्रवास करण्याचे हवाई वाहतुक नियामक प्राधिकरण “डीजीसीए’ने ठरवले आहे. अमेरिकेच्या हवाई वाहतुक नियामक प्राधिकरणाने पुढील सूचनेपर्यंत इराणच्या प्रभावक्षेत्रातील समुद्रावरूनही प्रवास न करण्याची सूचना अमेरिकेच्या विमानांना केली आहे.

सर्व भारतीय विमान कंपन्यांनी “डीजीसीए’बरोबरच्या चर्चेनंतर सुरक्षिततेसाठी इराणच्या प्रभावक्षेत्रातून विमान प्रवास टाळण्याचा निर्णय घेतला आहे, असे “डीजीसीए’ने ट्विटरवर म्हटले आहे. या निर्णयामुळे एअर इंडियाच्या वाहतुकीवर काही विशेष परिणाम होणार नसल्याचे एअर इंडियचे चेअरमन अणि व्यवस्थापकीय संचालक अश्‍वानी लोहानी यांनी म्हटले आहे. बालाकोटच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानमधील बहुतेक हवाई हद्द भारतीय विमानांसाठी बंदच आहे. आता इराणची हवाई हद्दही बंद झाल्यामुळे भारतीय विमानांना मध्यपूर्व, युरोप आणि अमेरिकेच्या प्रवासासाठी अधिक लांबच्या मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.