मुंबई, दि. 21 -वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड करण्यासाठी 21 जुलै रोजी भारतीय क्रिकेट निवड समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. निवड समितीने पत्रकार परिषद घेत टीमची घोषणा केली आहे.
टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौरा 3 ऑगस्टपासून सुरू होत आहे. हा दौरा 3 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन टी-20 मॅचेस, 3 वन-डे मॅचेस आणि दोन टेस्ट मॅचेस खेळणार आहे.
भारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे –
एकदिवसीय मालिका
पहिली वनडे : 8 ऑगस्ट 2019,
संध्याकाळी 7:00, गयाना
दुसरी वनडे : 11 ऑगस्ट 2019,
संध्याकाळी 7:00, त्रिनिदाद
तिसरी वनडे : 14 ऑगस्ट 2019,
संध्याकाळी 7:00, त्रिनिदाद
टी-20 मालिका
पहिला टी-20 सामना :
3 ऑगस्ट 2019, रात्री 8:00, फ्लोरिडा
दुसरा टी-20 सामना :
4 ऑगस्ट 2019, रात्री 8:00, फ्लोरिडा
तिसरा टी-20 सामना :
6 ऑगस्ट 2019, रात्री 8:00, गयाना
कसोटी मालिका
पहिली कसोटी : 22-26 ऑगस्ट,
संध्याकाळी 7:00, एंटिगुआ
दुसरी कसोटी: 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर,
रात्री 8:00, जमैका