#CWC19 : कॉट्रेलच्या ‘सॅल्यूट’ची प्रतिक्षा

मॅंचेस्टर – सैन्यदलात काम करणारा माणूस तेथील सवयी विसरत नाही. वेस्ट इंडिजच्या शेल्डॉन कॉट्रेल याच्या “सॅल्यूट”ने येथे लोकप्रियता मिळविली आहे. आजही येथील चाहते त्याची ही खासियत पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.

कॉट्रेल हा जमेकाच्या संरक्षण दलात काम करीत आहे. विश्‍वचषक स्पर्धेसाठी त्याला विशेष रजा देण्यात आली आहे. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत नऊ विकेट्‌स घेतल्या आहेत. न्यूझीलंडविरूद्ध त्याने 56 धावांत चार गडी बाद केले होते. ही त्याची या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी झाली आहे. प्रत्येक विकेट घेतल्यानंतर तो “सॅल्यूट” ठोकत प्रेक्षकांना अभिवादन देत असतो. त्याच्या या शैलीचा व्हिडिओ समाजमाध्यमांवरही प्रसारित झाला असून त्याला चाहत्यांकडून भरपूर पाठिंबा मिळत आहे. येथील रस्त्यांवरही लहान मुले-मुली त्याच्या शैलीची नक्कल करीत आहेत. कॉट्रेल याने चाहत्यांचे आभार मानले आहेत. वेस्ट इंडिजचे खेळाडू प्रत्येक विश्‍वचषकात अशी वेगवेगळी शैली करण्याबाबत ख्यातनाम आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.