रविवारी गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या टी-२० सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा १६ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. काल सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २० षटकात ३ गडी गमावून २३७ धावा केल्या होत्या. तर प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका संघाने २० षटकात ३ गड्यांच्या मोबदल्यात २२१ धावा केल्या. साऊथ आफ्रिका संघ हा सामना जरी हरला असला तरी त्यांनी सर्व चाहत्यांची मने जिंकली. कारण डेव्हिड मिलरने दक्षिण आफ्रिकेसाठी एकाकी झुंज देत ४७ चेंडूत १०६ धावांची शतकी खेळी केली.
दक्षिण आफ्रिका फलंदाजी करत असताना डावाच्या १२व्या षटकात अचानक रोहित शर्मा पॅव्हेलियनमध्ये परतला. कारण अचानक त्याच्या नाकातून रक्त येऊ लागले. त्यानंतर त्याने रुमालाने आपल्या नाकातून येणारे रक्त पुसले. गुवाहाटीत वातावरणात असलेल्या आर्द्रतेच्या प्रमाणामुळे असा प्रकार घडला असल्याचे सांगितले जात आहे. यानंतरही रोहित आपली कर्णधार पदाची जबाबदारी चोखपणे पार पडत असल्याचे दिसले.
या घटनेच्या व्हिडीओ सोशल मोडोयावर चांगलाच व्हायरल होत आहे. कारण रोहित शर्माने दुखापत होऊनही कर्णधार पदाची जबाबदारी पार पडली. रुमालाने रक्त पुसल्यानंतर तो खेळाडूंना सूचना देताना दिसला. त्याचा हाच अंदाज चाहत्यांना आवडला आहे. बरेच युजर्स या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया देत आहेत. ( India vs South Africa T20I Match Rohit Sharma had blood cooming from his nose )
Dedication of Rohit Sharma towards the game though he was bleeding he stayed there on field and was giving instructions and at last physio had to call him from outside. Respect and Salute @ImRo45 🙇 #RohitSharma𓃵 #CricketTwitterpic.twitter.com/8CjMBQpr3S
— ARYAN_OP™ (@ARYAN__OP) October 2, 2022
सामन्यात भारतीय संघाने २० षटकात ३ गड्यांच्या मोबदल्यात २३७ धावा केल्या होत्या. मैदानावर फलंदाजीसाठी आलेल्या प्रत्येक भारतीय फलंदाजाने शानदार खेळी केली. भारताकडून केएल राहुलने ५७ धावा, कर्णधार रोहित शर्मा ४३, सूर्यकुमार यादव २२ चेंडूत ६१ धावा, विराट कोहली नाबाद ४९, तर दिनेश कार्तिकने ७ चेंडूत दोन षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने नाबाद १७ धावा केल्या होत्या.