Team India : टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच भारताकडून खेळताना दिसणार नाही. पाठीच्या पाठीच्या दुखापतीमुळे तो या महत्त्वाच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याचबरोबर त्याला पुढील सहा महिने क्रिकेटच्या मैदानावर उतरता येणार नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी बुमराहच्या जागी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा भारतीय संघात ( Team India ) समावेश होण्याची शक्यता आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारी खेळला गेला, ज्यामध्ये बुमराह दुखापतीमुळे प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. बुमराहच्या जागी दीपक चहरला या सामन्यात संधी देण्यात आली होती. दीपक चहरने सामन्यात चांगली गोलंदाजी केली.
क्रिकबझच्या मते, बुमराह आता साऊथ आफ्रिका विरुद्धच्या टी-२० मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे त्याच्या जागी मोहम्मद सिराजला संधी दिली जाऊ शकते. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, बुमराहला पाठीच्या दुखापतीचा त्रास आहे. त्यामुळे बुमराह टी-२० विश्वचषक खेळू शकणार नाही. बुमराहपूर्वी संघाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे या स्पर्धेतून बाहेर पडला असून आता बुमराहचे बाहेर पडणे हा टीम इंडियासाठी ( Team India ) मोठा धक्का आहे. ( India vs South Africa mohammad Siraj Likely replace to Jasprit Bumrah for IND vs SA T20i Serise )
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेबद्दल बोलायचे झाले तर, भारताने या मालिकेतील पहिला सामना ८ जिंकला आहे. भारतीय संघाने ( Team India ) सध्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारतीय संघाच्या दमदार गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिका संघाला पहिल्यांदा फलंदाजी करताना केवळ१०६ धावाच करता आल्या. भारताकडून केएल राहुलच्या नाबाद ५१ आणि सूर्यकुमार यादवच्या नाबाद ५० धावांच्या जोरावर टीम इंडियाने सामना खिशात घातला.