Ind vs SA 1st Test Day 5 : भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर, आफ्रिकेेचे ८ गडी बाद

विशाखापट्टणम – भारत आणि दक्षिण आफ्रिकामध्ये सुरू असलेला पहिला कसोटी सामना आता रंगतदार वळणावर आला आहे. या कसोटीत भारतीय संघ अखेरच्या दिवशी विजयाच्या जवळ पोहचला आहे. रविंद्र जाडेजा आणि मोहम्मद शमी यांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे आफ्रिकेचे दिग्गज फलंदाज माघारी परतले आहेत. चौथ्या दिवशी भारताने आफ्रिकेला विजयासाठी ३९५ धावांचं आव्हान दिल.

दरम्यान, आजच्या अखेरच्या सत्रात आश्विनने डी-ब्रूनला बाद करत दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का दिला. यानंतर क्विंटन डी-कॉक, मार्क्रम, फिलँडर, हे फलंदाजांना लवकर बाद करण्यात गोलंदाज यशस्वी ठरले. शमी आणि जाडेजाने आफ्रिकेच्या फलंदाजांना मैदानावर स्थिरावण्यास वेळच दिला नाही. भारताने पहिल्या डावात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेऊन 502 धावांचा भक्कम स्कोअर उभा केला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ 431 धावांवर गारद झाला. त्यामुळे पहिल्या डावात भारताला 71 धावांची आघाडी मिळाली.

दुसऱ्या डावात भारताने 395 धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेला दिले. त्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची चांगलीच दाणादाण भारतीय गोलंदाजांनी केली आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ 117 धावांवर खेळत असून त्यांचे 8 गडी माघारी पाठवण्यात भारतीय संघाला यश आले आहे. त्यामुळे भारतीय संघ विजयाच्या समीप पोहचला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here