#CWC19 : आमच्या क्रिकेट संघावर बंदी घाला; पाकिस्तानी चाहत्याची न्यायालयात धाव

लाहोर – भारत आणि पाकिस्तानदरम्यान विश्‍वचषक स्पर्धेत झालेल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा संघ 89 धावांनी पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानच्या संघावर सगळीकडून टीका होत असताना पाकिस्तानी संघाच्या एका चाहत्याने थेट कोर्टात धाव घेतली असून खराब प्रदर्शन करणाऱ्या आमच्या संघासहित संघातील खेळाडू आणि निवड समितीवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी त्याने याचिका अर्ज दाखल केला आहे.

भारत आणि पाकिस्तान हे संघ एकमेकांचे पारंपरिक शत्रू असून दोन्ही संघांदरम्यानचे सामने हे युद्धापेक्षा कमी नाहीत. त्यातच पाकिस्तानचा संघ विश्‍वचषकातील सामन्यात एकतर्फी पराभूत झाल्याने सगळीकडून त्यांच्या संघावर टीका केली जात असतानाच एका चाहत्याने उचललेल्या या पावलाची चर्चा होताना दिसून येत आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गुजरनवाला कोर्टाच्या न्यायाधीशांनी या याचिकेच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाला एक नोटीस पाठवली आहे.

त्यातच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या आज होणाऱ्या मिटिंगमध्ये काही कठोर निर्णय होणार असून ज्याद्वारे मॅनेजमेंटसह प्रशिक्षक आणि निवड समितीमध्ये अनेक बदल केले जाणार असल्याची माहिती स्था

Leave A Reply

Your email address will not be published.