Davis Cup 2019: कझाकिस्तानमध्ये भारत-पाकिस्तानचा रंगणार सामना

नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आगामी डेव्हिस कपचा मुकाबला कझाकिस्तानची राजधानी ‘नूर सूलतान’ या शहरात खेळवण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने( आयटीएफ) यासंदर्भात माहिती दिली आहे. आयटीएफच्या मते कझाकिस्तानमधील ‘व्हिसा ऑन अराइवल’ या प्रकियेमुळे या ठिकाणी ही स्पर्धा खेळवण हे सोप जाईल.

आय़टीएफने दिलेल्या माहितीमध्ये म्हटलय की, “आम्हाला प्रेक्षकांची आणि खेळाडूंची चिंता आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव इस्लामाबादमध्ये होणारा हा सामना कझाकिस्तामध्ये होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले”. दरम्यान, कझाकिस्तानमध्ये या दोन्ही उभयंता देशांमध्ये 29 आणि 30 नोव्हेंबरला हा मुकाबला होईल.

नूर सुलतानमध्ये सामना खेळवण्याकरता हे ठिकाण ठरवण्याकरता 4 जूनपर्यंत कालावधी देण्यात आला होता. त्यानंतर 18 नोव्हेंबरपर्यंत ही मुदत ठरवण्यात आली होती. अखेर या दोन्ही देशांमधील टेनिसचा थरार कझाकिस्तानमध्ये अनुभवायला मिळेल.

Leave A Reply

Your email address will not be published.