#NZvIND : भारताला मालिकेत वर्चस्वाची संधी

सामन्याची वेळ : सकाळी 7.30 पासून
स्थळ : द बे ओव्हल (माउंट मोंगानुई)

माउंट मोंगानुई – भारतीय संघ सध्या न्युझीलंडच्या दौऱ्यावर असून दोन्ही संघांदरम्यान आजपासून (दि. 28) तिसरा एकदिवसीय सामना रंगणार असून पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघ 2-0ने आघाडीवर आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाकडे मालिका विजयाची संधी असणार आहे. तर, न्युझीलंडसमोर आजच्या सामन्यात विजय मिळवून मालिकेतील आपले जिवंत ठेवण्याचे आव्हान असणार आहे.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी भारताच्या कुलदीप यादव, युझवेंद्र चहल या फिरकी गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली होती. तर मोहम्मद शमीने पहिल्या सामन्यात तीन बळी मिळवून झटपट 100 बळींचा टप्पाही पूर्ण केला होता. तर, दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांच्या सुरेख कामगिरीनंतर पुन्हा भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर न्युझीलंडच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. त्यामुळे भारतीय संघ मालिकेत आघाडीवर आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ऑस्ट्रेलियायेथिल एकदिवसीय मालिकेपासून भारतीय गोलंदाजांची कामगिरी सुरेख झालेली असली तरी, अद्याप मधल्या फळीतील फलंदाजांना एक दोन सामने वगळता चांगली कामगिरी करता आलेली नाही. तसेच विश्‍वचषक स्पर्धेपुर्वी भारतीय संघाचा हा शेवटचा परदेश दौरा असल्या कारणाने या दौऱ्यात मधल्याफळी बाबद अनेक फेर बदल केले जाऊ शकतात. त्यामुळे न्यूझीलंड दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. यातूनच भारताला या मालिकेतून आपला अंतिम अकरा खेळाडूंचा क्रम निश्‍चित करावा लागणार आहे. त्यानुसार सध्या संघामध्ये अनेक बदल केले जात आहेत.

तर दुसरीकडे, हार्दिक पंड्यावरील निलंबन रद्द करण्यात आले आहे. तो न्यूझीलंडमध्ये दाखल झाला असून त्याला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात संघात समाविष्ट केले गेले नव्हते. दुसऱ्या सामन्यातही संघ व्यवस्थापनाने अष्टपैलू विजय शंकरला स्थान दिले होते. मात्र, पहिल्या सामन्याप्रमाणे दुसऱ्या सामन्यातही त्याला फलंदाजी करण्याची गरज भासली नव्हती. मात्र, दुसऱ्या आणि पहिल्या सामन्यात मिळून त्याने केवळ सहाच षटके गोलंदाजी केली होती. ज्यात पहिल्या सामन्यात चार षटके तर दुसऱ्या सामन्यात केवळ दोन षटके त्याने टाकली आहेत. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात त्याच्या जागी हार्दिक पांड्या संघात पुनरागमन करु शकतो.

तर, भारतासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे शिखर धवनने पहिल्या सामन्या प्रमाणेच दुसऱ्या सामन्यातही अर्धशतकी खेळी केली असून त्याला सूर गवसला आहे. त्याने पहिल्या लढतीत नाबाद 75 धावांची खेळी करून विजयात मोलाचा वाटा उचलला होता. तर, दुसऱ्या सामन्यात त्याने 66 धावांची खेळी करत रोहित शर्माच्या साथीत 154 धावांची सलामी दिली होती.
दुसरीकडे, मागील भारताविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत न्यूझीलंडने 4-0 अशा फरकाने विजय मिळवला होता. मात्र, या वेळी त्यांची सुरुवात मनासारखी झालेली नसून पहिल्या दोन्ही सामन्यात एकतर्फी पराभव पत्करावा लागल्यानंतर तिसरा सामना जिंकून मालिकेत आपले आव्हान कायम राखण्यासाठी न्यूझीलंडचा संघ आटोकाट प्रयत्न करेल.

भारतासाठी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन डोकेदुखी ठरू शकतो. त्याचा अपवाद वगळता इतर न्यूझीलंडचे फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करताना संघर्ष करताना दिसून आले होते. तर, त्यांच्या फलंदाजांना अद्याप कुलदीप यादवच्या गोलंदाजीचा सामना कशा प्रकारे करावा याचे कोडे उलगडलेले दिसुन येत नाही. त्यामुळे चांत्गल्या सुरूवातीनंतरही त्यांचे फलंदाज भारतीय फिरकी समोर नांगी टाकताना दिसून येत आहेत.

प्रतिस्पर्धी संघ –

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, विजय शंकर, शुभमन गिल, खलील अहमद, युझवेंद्र चहल, हार्दिक पांड्या.

न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), मार्टिन गप्टील, टॉम लॅथम, कॉलिन मुन्रो, हेन्री निकोल्स, मिचेल सॅंटनर, इश सोधी, टीम साउदी, रॉस टेलर, कॉलिन डीग्रॅंडहोम, ट्रेंट बोल्ट, डग ब्रेसवेल, लॉकी फर्ग्युसन, मॅट हॅन्री.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)