हॅमिल्टन : भारताविरूध्दच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर झाला असून संघाला आता अपयशी कामगिरीबरोबरच खेळाडूंच्या दुखापतींनीही ग्रासले आहे. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट, फलंदाज लोकी फर्ग्युसन आणि अष्टपैलू मॅट हेन्री यांना दुखापत झाल्याने त्यांच्या जागी आता नव्या खेळाडूंची संघात निवड करण्यात आली आहे.
येत्या ५ फेब्रुवारीपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरूवात होणार आहे. केल जेमिसनला पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. तर स्काॅट कगीलेन आणि हामिश बेनेट यांनी खूप कालावधीनंतर संघात पुनरागमन केलं आहे.
New Zealand fast bowlers Kyle Jamieson, Scott Kuggeleijn and Hamish Bennett have received call-ups for the three-match ODI series against India.
Details 👇 https://t.co/4upxmyj8ho
— ICC (@ICC) January 30, 2020
न्यूझीलंडचा एकदिवसीय संघ : केन विल्यमसन (कर्णधार), हामिश बेनेट, टाॅम ब्लंडेल, काॅलीन डी ग्रँडहोम, मार्टिन गुप्टील, केल जेमिसन, स्काॅट कगिलेन, टाॅम लाथम, जिमी नीशाम, हेनरी निकोल्स, मिशेल सेंटनर, ईश सोधी, टीम साउदी, राॅस टेलर.
सामन्यांचे वेळापत्रक (सर्व सामने भारतीय वेळेनुसार सकाळी ७.३० वाजता) : (१) पहिला सामना – हॅमिल्टन – ५ फेब्रुवारी. (२) दुसरा सामना – आॅकलंड – ८ फेब्रुवारी (३) तिसरा सामना – माऊंट माउंगानुई – ११ फेब्रुवारी.