IND vs NZ Test series 2024 (Team India squad) : न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी भारताने संघ जाहीर केला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 16 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्याचा पहिला सामना बेंगळुरू येथे होणार आहे. टीम इंडियाने रोहित शर्माला कर्णधार बनवले आहे. त्याच्यासोबत जसप्रीत बुमराहलाही महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे. बुमराहला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. विराट कोहली, केएल राहुल आणि सरफराज खानसोबत आकाश दीपलाही संघात संधी मिळाली आहे.
बीसीसीआयने 15 सदस्यांच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये अनुभवी खेळाडूंसोबतच नवीन खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. टीम इंडियाने अलीकडेच कसोटी मालिकेत बांगलादेशचा पराभव केला होता. आता तोच संघ न्यूझीलंडचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. न्यूझीलंडविरुद्ध बेंगळुरू, पुणे आणि मुंबई येथे कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.
बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेदरम्यान निवडलेल्या खेळाडूंनाही या मालिकेत संधी देण्यात आली आहे. फक्त एक मोठा बदल दिसत आहे. वास्तविक, या मालिकेपूर्वी कोणत्याही खेळाडूकडे टीम इंडियाचे उपकर्णधारपद नव्हते, मात्र न्यूझीलंड मालिकेसाठी नव्या उपकर्णधाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेत जसप्रीत बुमराह भारताचा उपकर्णधार असेल.
A look at #TeamIndia’s squad for the three-match Test series against New Zealand 🙌#INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/Uuy47pocWM
— BCCI (@BCCI) October 11, 2024
न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांसाठी भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर) , रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप.
ट्रॅव्हल रिजर्व्ह खेळाडूंची केली घोषणा …
भारतीय संघाच्या घोषणेसोबतच बीसीसीआयने इतर चार खेळाडूंचाही प्रवास राखीव म्हणून समावेश केला आहे. नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, मयंक यादव आणि प्रसिद्ध कृष्णा हे प्रवासी राखीव म्हणून टीम इंडियाशी संबंधित आहेत. नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा आणि मयंक यादव हे भारतीय कसोटी संघाकडून अद्याप खेळलेले नाहीत. प्रसिध्द कृष्ण भारताकडून कसोटी खेळला आहे. बीसीसीआयने ट्रॅव्हल रिझर्व्हमध्ये तीन वेगवान गोलंदाजांचा समावेश केला आहे. यावरून या मालिकेसोबतच भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्याचीही तयारी करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.