#CWC19 : उपांत्य फेरीत ‘या’ संघाच भारतापुढं असणार आव्हान

लंडन – क्रिकेट विश्वचषकात सातवा विजय मिळवत आणि श्रीलंकेच्या संघाला पराभूत करत भारताच्या संघाने गुणतालिकेतही बाजी मारली आहे. त्यामुळे आता या ‘विराटसेने’चं एकच लक्ष्य असणार आहे… आणि ते म्हणजे विश्वविजेतेपद मिळवण्याचं.

कालच्या अखेरच्या साखळी सामन्यात भारताने श्रीलंकेला तर द.आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. त्यामुळे भारत 15 गुणांसह अव्वलस्थानी पोहचला आहे. त्यामुळे आता उपांत्य फेरीतील लढतीचं चित्र सुध्दा स्पष्ट झालं आहे.

गुणतालिकेत भारत अव्वलस्थानी आणि न्यूझीलंड चौथ्या स्थानी आहे. त्यामुळं गुणतालिकेत प्रथम स्थानी असणाऱ्या भारतीय संघाला उपांत्य फेरीत न्यूझीलंड संघाचं आव्हान असणार आहे. मंगळवारी (9 जुलै) सांयकाळी 6 वाजता हा सामना मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर पार पडणार आहे. सध्याच्या घडीला भारतीय संघातील खेळाडूंचा फॉर्म पाहता न्यूझीलंडच्या संघापुढे हे एक आव्हान असणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.