दुबई – आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेतील भारत विरूध्द हॉंगकॉंग या सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार असून तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा(टाॅस) कौल हा हॉंगकॉंगच्या बाजूने लागला आहे. कर्णधार निजाकत खान याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
Hong Kong won the toss and chose to bowl first. @ACCMedia1 #INDvHK#HongKong #HK #Cricket #CHK #HKCricket #CricketHK #HKTeam #teamhk #T20 #asiancricketcouncil #ACC #AsiaCup2022 #GetReadyForEpic pic.twitter.com/SxfdKe6TIy
— Cricket Hong Kong (@CricketHK) August 31, 2022
भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग-11 मध्ये बदल केला आहे. हार्दिक पांड्याला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर हाँगकाँगचा कर्णधार निजाकत खानने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही.
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे :-
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, दीपक सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग.
हाँगकाँग : निझाकत खान (कर्णधार), यासीम मोर्तझा, बाबर हयात, किंचित शाह, एजाज खान, स्कॉट मॅकेनी (विकेटकीपर), झीशान अली, हारून अर्शद, एहसान खान, आयुष शुक्ला, मोहम्मद गझनफर.