नॉटिंगहॅम – जसप्रीत बुमराह आणि महंमद शमी यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर भारताने यजमान इंग्लंडला 183 धावांवर रोखलं. इंग्लंडचा पहिला डाव 65.4 षटकांत केवळ 183 धावांवर आटोपला.
भारत व इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला बुधवारपासून पहिल्या सामन्याने सुरुवात झाली. यजमान इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूटने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
भारताकजून जसप्रीत बुमराहने आज सर्वाधिक चार विकेट घेतल्या. त्यापाठोपाठ मोहमद शमीने 3 तर शार्दुल ठाकूरने 2 आणि सिराजने 1 विकेट घेतल्या. तर इंग्लंडकडून कर्णधार जो रुटने सर्वाधिक 68 धावांची खेळी केली. तसेच सॅम करनने नाबाद 27 आणि जॉनी बेअरस्टोने 29 धावा केल्या.
Stellar bowling performance from #TeamIndia bowlers as England is bowled out for 183.
Scorecard – https://t.co/TrX6JMiei2 #ENGvIND pic.twitter.com/HuWiTj0biJ
— BCCI (@BCCI) August 4, 2021
भारतीय संघ – रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, केएल राहुल.
इंग्लंड संघ – जो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, डॉमिनिक सिबली, जोस बटलर, सॅम करन, जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, डोमिनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, झॅक क्रॉली, ओली रॉबिन्सन.