भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये कसोटी आणि टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. बांगलादेशचा संघ भारताच्या दौऱ्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या मालिकेत रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. विशेष म्हणजे या संघात काही नवीन चेहऱ्याना संधी देण्यात आली आहे. ते खेळाडू कोणते आहेत चला पाहुयात…
1) ध्रुव जुरैल
ध्रुव जुरैल याला पुन्हा एकदा रोहित शर्माने संघात स्थान दिले आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये ध्रुवची बॅट चालली नव्हती. परंतू त्याने विकेटकिपर म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. आता रोहित शर्मा त्याला प्लेइंग ११ मध्ये संधी देतोय का ? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
2) सरफराज खान
सरफराज खान याला अथक प्रयत्नानंतर इंग्लंडविरुद्ध संधी मिळाली होती. त्यानंतर आता सरफराजला बांगलादेशविरुद्ध संधी मिळाली आहे.आता रोहित शर्मा त्याला प्लेइंग ११ मध्ये संधी देतोय का ? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
3) आकाश दीप
एकमेव टेस्ट सामना खेळलेल्या आकाश दीपला पुन्हा एकदा टीम इंडियामध्ये संधी देण्यात आली आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये केलेल्या कामगिरीमुळे त्याला ही संधी मिळाली आहे. आता रोहित शर्मा त्याला प्लेइंग ११ मध्ये संधी देतोय का ? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
4) ऋषभ पंत
टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने 21 महिन्यांनंतर टीम इंडियामध्ये कमबॅक केले आहे. अपघातातून बरे झाल्यानंतर त्याची ही पहिलीच कसोटी मालिका असणार आहे.
5) यश दयाल
युवा स्टार गोलंदाज यश दयाल याला मेहनतीचं फळ मिळालं असून त्याला टीम इंडियाकडून डेब्यू करण्याची संधी मिळणार आहे. आयपीएल आणि दुलीप ट्रॉफीमधील चांगल्या खेळीचे त्याला फळ भेटले आहे. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतून त्याला डेब्यू करण्याची संधी भेटते का ? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
टीम इंडियाचं वेळापत्रक
बांगलादेशचा भारत दौरा 19 सप्टेंबरपासून सुरू होणार असून, पहिली कसोटी चेन्नईत खेळवली जाणार आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना 27 सप्टेंबर रोजी कानपूरमध्ये खेळवला जाईल. त्यानंतर 6 ऑक्टोबरला ग्वाल्हेरमध्ये 3 सामन्यांची टी-20 मालिका सुरू होईल. दुसरा टी-20 सामना 9 ऑक्टोबरला दिल्लीत, तर तिसरा आणि शेवटचा सामना 12 ऑक्टोबरला हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे.
बांगलादेशविरुद्ध टीम इंडिया
रोहित शर्मा (C), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (WK), ध्रुव जुरेल (WK), आर अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.