#CWC19 : भारताचे आघाडीचे 4 फलंदाज बाद; धोनी-केदारवर फलंदाजीची मदार

साउदॅम्पटन – गतविजेता ऑस्ट्रेलिया व त्यापाठोपाठ पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचाही दणदणीत पराभव करणाऱ्या भारताच्या दृष्टीने आज सोपा पेपर आहे, असे म्हटले जात होते. अफगाणिस्तानच्या फिरकी गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांना आक्रमक फलंदाजी करता आली नाही.

टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेल्या भारताचे चार फलंदाज तंबूत परतले असून शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारताच्या 36 षटकांत 4 बाद 156 धावा झालेल्या आहेत. तेव्हा आता मोठी धावसंख्या उभारण्याची जबाबदारी केदार जाधव आणि महेंद्रसिंग धोनीवर असणार आहे.

सध्या खेळपट्टीवर एम.एस. धोनी हा 12* (27) आणि केदार जाधव 16*(29) धावांवर खेळत आहेत. तत्पूर्वी भारताचा सलामीवीर रोहित हा 1 आणि के एल राहुल हा 30 धावांवर बाद झाला. त्यानंतर विजय शंकर आणि विराट कोहली यांच्या अर्धशतकी भागिदारीनंतर विजय शंकर 30 धावांवर बाद झाला, त्यानंतर विराट कोहली 67 धावांवर बाद झाला. अफगाणिस्तानकडून मोहम्मद नाबीने 2 तर मुजीब उर रहमान आणि रहमत शाहने 1 गडी बाद केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)