ब्लूफाँफटेन (द. आफ्रिका) : भारताच्या युवा संघाने आपल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अभियानाला थाटात सुरूवात केली आहे. गतविजेत्या भारतीय संघाने १९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या लढतीत रविवारी श्रीलंकेचा ९० धावांनी पराभव करत मोठा विजय मिळवला आहे.
India Under 19 kick off #U19CWC campaign with a 90-run win over Sri Lanka Under 19. 👏👏
Report 👉👉https://t.co/rWHJJun7fy#INDvSL pic.twitter.com/pRPv3KrFh1
— BCCI (@BCCI) January 19, 2020
भारताने प्रथम फलंदाजी करताना यशस्वी जैस्वालच्या ५९, कर्णधार प्रियम गर्गच्या ५६, ध्रुव जुरेलच्या नाबाद ५२, तिलक वर्माच्या ४६ आणि सिध्देश वीरच्या नाबाद ४४ धावांच्या खेळीच्या जोरावर ५० षटकांत ४ बाद २९७ अशी मजल मारली होती.
Fifties from Yashasvi Jaiswal, skipper Priyam Garg and Dhruv Jurel guide India U19 to 297/4 against Sri Lanka U19 in their opening match of #U19CWC.
Follow it live 👉👉https://t.co/XiJYfYoD0M#INDvSL #TeamIndia pic.twitter.com/qZ0ZdlHZzM
— BCCI (@BCCI) January 19, 2020
यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव ४५.२ षटकांत २०७ धावांत आटोपला. श्रीलंकेकडून फलंदाजीत निपुण धनंजयाने सर्वाधिक ५०, रविन्दु रसन्थाने ४९ आणि कमिल मिशाराने ३९ धावांची खेळी केली.
India start with a win!
They beat Sri Lanka by 9️⃣0️⃣ runs.#U19CWC | #INDvSL | #FutureStars pic.twitter.com/rRYmarcRqK
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) January 19, 2020
भारताकडून गोलंदाजीत रवि बिश्नोई (२-४४), सिध्देश वीर (२-४४) आणि आकाश सिंग ( २-२९) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. कार्तिक त्यागी (१-२७), सुशांत मिश्रा (१-३४) आणि जैस्वाल (१-१८) यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
Today’s Player of the Match Siddhesh Veer 🏅 #U19CWC | #INDvSL | #FutureStars pic.twitter.com/ToZimR6C4E
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) January 19, 2020
भारताचा सिध्देश वीर सामन्याचा मानकरी ठरला. त्याने फलंदाजीत २७ चेंडूत नाबाद ४४ आणि गोलंदाजीत ४४ धावांत दोन गडी बाद करत संघाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिले. भारताची आता २१ जानेवारीला जपानविरूध्द लढत होईल.