नवी दिल्ली : प्रियंका देवीच्या एकमेव गोलच्या जोरावर भारताच्या १७ वर्षाखालील महिलांच्या संघाने दुस-या मैत्रीपूर्ण लढतीत रोमानियाचा १-० असा पराभव करत विजय मिळविला. दरम्यान, पहिली लढत ३-३ अशी बरोबरीत सुटली होती.
The India 🇮🇳 U17 Women's team recorded a fine 1⃣-0⃣ win in a friendly match against Romania 🇷🇴! 🙌
Watch the highlights here 🎥#IndianFootball ⚽ #BackTheBlue 💙 #ShePower 👧 pic.twitter.com/ot39Fk4jbS
— Indian Football Team (@IndianFootball) February 20, 2020
भारतीय संघाकडून प्रियंकादेवीने २९ व्या मिनिटाला पेनल्टीव्दारे गोल केला. हाच गोल निर्णायक ठरला आणि भारताने लढत जिंकली.
FULL TIME! INDIA WINS! 🇮🇳🇮🇳👏👏
The India U-17 women's side defeats Romania ✅ in their second friendly, with Priyangka Devi scoring the decisive goal 🔥
FT Score: 🇷🇴 0-1 🇮🇳#ROMIND ⚔ #BackTheBlue 💙 #ShePower 👧 #IndianFootball ⚽ pic.twitter.com/yUWpRUKZ2B
— Indian Football Team (@IndianFootball) February 19, 2020
दरम्यान, या आधीच्या रोमानियाविरूध्दच्या पहिल्या मैत्रीपूर्ण लढतीत भारताने ३-३ अशी बरोबरी साधली होती. या लढतीत भारताकडून मरियम्मा बालामुरूगन हिने २ तर सुमतीकुमारीने १ गोल केला होता.