करोनाचा नवीन व्हेरियंट ‘ओमायक्रॉन’पासून भारत सावध; ‘या’ 12 देशांतील प्रवाशांसाठी ‘स्क्रिनिंग’ अनिवार्य

नवी दिल्ली – ओमायक्रॉन या करोनाच्या नवीन व्हेरियंटने जगातील इतर देशांसह भारताची चिंता वाढवली आहे. करोनाच्या या घातक व्हेरियंटला थांबवण्यासाठी भारत सरकारने दक्षिण आफ्रिका, ब्रिटन, हाँगकाँग आणि बोत्सवानासह १२ देशांची नावे जाहीर केली आहेत. या देशातून येणार्‍या विमान प्रवाशांची तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे.

बाहेरून येणाऱ्या या सर्व प्रवाशांना भारत सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करने बंधनकारक असणार आहे. यापूर्वी आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC) ने नोंदवल्यानुसार तीन देशांमध्ये करोना व्हेरियंट B.1.1 (Omicron) ची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. बोत्सवानामध्ये तीन, दक्षिण आफ्रिकेत सहा आणि हाँगकाँगमध्ये एक नवीन व्हेरियंटची उदाहरणे समोर आली आहेत.

या 12 देशांतील प्रवाशांसाठी स्क्रिनिंग अनिवार्य
ज्या १२ देशांमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी स्क्रीनिंग अनिवार्य करण्यात आले आहे त्यामध्ये दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बांगलादेश, बोत्सवाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, सिंगापूर, इस्रायल, हाँगकाँग, यूके या युरोपातील देशांचा समावेश आहे.

WHO ने ओमायक्रॉन असे या नवीन व्हेरियंटला नाव दिले
करोनाचा एक नवा आणि आतापर्यंतचा सर्वाधिक बदल किंवा उत्परिवर्तन (म्युटेशन) झालेला विषाणू आढळला आहे. या नव्या B.1.1.529 विषाणूला जागतिक आरोग्यसंघटनेने ओमायक्रॉन – Omicron हे ग्रीक नाव दिलं आहे. या विषाणूचा समावेश WHO ने ‘Variant of Concern’ म्हणजेच काळजी करण्याजोग्या व्हेरियंटच्या यादीत केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.