वॉशिंग्टन : जगातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अल जवाहरीचा खातमा 31 जुलै रोजी अमेरिकेने एका ड्रोनच्या सहाय्याने केला होता. एमक्यू नाईन बी नावाचा हे ड्रोन अतिशय अत्याधुनिक आणि घातक समजले जाते. आता भारताने सुद्धा अमेरिकेकडून हे ड्रोन खरेदी करायचा निर्णय घेतला आहे. हा ड्रोन तयार करणाऱ्या कंपनीचे नाव ॲटॉमिक ग्लोबल कॉर्पोरेशन असे असून त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक लाल हे भारतीय आहेत.
भारताने हे ड्रोन खरेदी करण्याची उत्सुकता दाखवली असून चर्चा शेवटच्या टप्प्यावर असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. हा एक ड्रोन असला तरी तो कोणत्याही लढावू विमाना पेक्षा कमी नाही. एका वेळी तब्बल पस्तीस तास उडण्याची क्षमता या ड्रोन मध्ये आहे आणि 1900 किलोमीटर अंतरावर पर्यंत तो लक्ष्यावर नजर ठेवून शकतो आणि लक्ष भेद करू शकतो. या एका ड्रोनचे वजन साधारण 2200 किलो ग्रॅम असून ते 50 हजार फूट उंचीपर्यंत उडू शकते.
एका ड्रोनची किंमत भारतीय रुपयांमध्ये साधारण दोन हजार तीनशे नव्वद कोटी रुपये एवढी आहे या ड्रोन वापर करून एकाच वेळी चार क्षेपणास्त्रे प्रक्षेपित करता येऊ शकतात, त्यामुळे जगभरातील देशांसाठी हे एक महत्त्वाचे शस्त्र मानले जाते. अमेरिकेने आत्तापर्यंत अनेक वेळा या ड्रोनचा वापर केला असून आता भारताने सुद्धा या डॉनचे खरेदी करण्याबाबत उत्सुकता दाखवली आहे.